News

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रवेशाच्या महत्वपूर्ण सूचना

19-05-2018

(शैक्षणिक वर्ष २०१८–१९ प्रवेशाच्या महत्वपूर्ण सूचना- For eligible students for the admission in SE, TE and BE in 2018-19)

राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी

जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) जमा केलेले नसल्यास तातडीने जमा करावे अन्यथा आपला मे/जून २०१८ परीक्षेचा निकाल जाहीर होणार नाही, कुठल्याही शासकीय शिष्यवृत्तीस पात्र राहणार नाहीत / प्राप्त झालेली शिष्यवृत्ती परत करावी लागेल तसेच डी.टी.ई, मुंबईयांच्या नियमाप्रमाणे आपला प्रवेशही रद्द होऊ शकतो.

शासकीय शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांसाठी

सुट्ट्यांमध्ये सन २०१७-२०१८ चा आपल्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला तहसीलदार कार्यालयातून काढून आणणे. रेशनकार्ड मध्ये विद्यार्थाचे व पालकाचे आपल्या शैक्षणिक कागदपत्रांप्रमाणे नाव/आडनावात  किंवा तसेच इतर काही दुरुस्ती असल्यास करून घेणे.  सन २०१८-१९ पासून पालकांच्या ८ लाख उत्पन्नाप्रमाणे शिष्यवृत्ती / EBC लागू राहील (अटी व शर्ती लागू). शासकीय शिष्यवृत्तीच्या संबंधीतले सर्व शासन निर्णय www.rcpit.ac.in येथे ‘Scholarship’ या भागात उपलब्ध आहेत. शिष्यवृत्तीधारकांनी शिष्यावृत्तीबद्दल चे सर्व नियम वाचावे.

शैक्षणिक शुल्क/ फी

आपल्या प्रवेशित वर्षाप्रमाणे व आपल्या प्रवार्गप्रमाणे आपली सन २०१८-१९ साठीचा फी तक्ता (category fee) महाविद्यालयाच्या नोटीस बोर्ड वर व संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या संवर्ग (Category) प्रमाणे शासकीय शिष्यवृत्ती फी वगळता आपल्या हिश्याची संपूर्ण शुल्क / फी (१००%) महाविद्यालयाच्या  ऑनलाईन प्रणालीत भरणे अनिवार्य आहे. अन्यथा शै. व. २०१८ साठी आपली प्रवेश नोंदणी होणार नाही याची नोंद घ्यावी.या सुट्टीच्या काळात आपल्या हिश्याचीपूर्ण फी चे नियोजन करावे.

मोबाईल क्रमांक

सर्व विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी व आपल्या बँकेशी (ऑनलाईन बँक खात्याशी) संलग्निकृत करून घ्यावा. याच मोबाईल क्रमांकाचा वापर आपण प्रवेश प्रक्रिया / शिष्यवृत्ती प्रक्रिया / परीक्षा शुल्क भरण्यासाठी करावा. तसेच हाच मोबाईल क्रमांक आपल्या महाविद्यालयाच्या दैनदिनी संपर्कासाठी जसे कि Local guardian किंवा आपले विभागाचे कार्यालय किंवा Office येथे आपल्या प्रवेशाच्या वेळी update करावा.

ऑनलाईन फी भरण्यासाठी

विद्यार्थ्यांनी आपले शुल्क / फीसन २०१८-१९ पासून महाविद्यालयाच्या ऑनलाईन प्रणालीत भरणे अनिवार्य आहे. त्याची प्रकिया स्वतंत्रपणे आपणास कळवण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ पासून विद्यापीठ, परिक्षा, शुल्क/ फी, महाविद्यालाची शैक्षणिक फी ही ऑनलाईनपद्धतीने आपल्या आधार संलग्निकृत online banking नेच भरावयाची असल्यामुळे आपले आधार संलग्निकृत बँकेचे खाते हे online करून घेणे आवश्यक आहे.

वरील गोष्टींची पूर्तता सर्व विध्यार्थ्यानी सुट्ट्यांमध्ये करून घ्यावी जेणेकरून प्रवेश प्रक्रियेच्या वेळी आपणास अडचण येणार नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर चार दिवसातच प्रवेश घेणे बंधन कारक आहे अन्यथा आपल्याला प्रवेश मिळणार नाही याची नोंद घ्यावी.


Our Recruiters