News

Zee २४ तास : Young Innovator Award

13-06-2018

 Zee २४ तास : Young Innovator Award

आर. सी. पटेल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेचे अंतिम वर्षातील विद्यार्थी विनोद पाटील, गोविंद साळुंखे, पंकज पाटील, सचिन कुंभार व मुजाहीद खाटीक या विद्यार्थ्यांच्या चमु ने Power Generation on Highway using Vertical Axis Wind Turbine and Solar System या नाविन्यपूर्ण संकल्पनेसह, झी २४ तास प्रोत्साहित ZEE Young Innovator Award या स्पर्धेत भाग घेतला होता.

त्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संकल्पना मांडली की, नैसर्गिक स्रोतापासून उर्जा निर्मिती केली जाऊ शकते. महामार्गावर जेव्हा वेगाने वाहन जाते, त्यावेळी हवेचा दाब निर्माण होतो. त्याचाच वापर करून विंड टर्बाईन फिरते व जनरेटरच्या सहाय्याने वीज निर्मिती होते. या प्रकल्पात सोलर प्लेटचा देखील दोन प्रकारे वापर केलेला आहे. प्रथम म्हणजे वाहन धावल्यानंतर जी हवा निर्माण होते तिला टर्बाईनच्या दिशेने वळविणे आणि दुसरा उपयोग म्हणजे दिवसा सूर्यापासून तर रात्री वाहनाच्या हेडलाईटपासून वीज निर्मिती करणे, म्हणजेच संयुक्त वीजनिर्मितीसाठी याचा वापर होतो. या प्रकल्पाचा वापर करून आपण हायवे टोल प्लाझाला मोफत वीज पुरवठा करू शकतो.

या स्पर्धेत त्यांच्या या नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय प्रकल्पाला २४ तास तर्फे Young Innovator Award म्हणून दुसरे पारितोषिक मिळाले. यश संपादन करून महाविद्यालय व संस्थेस नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक व उमवी चे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. नितीन पाटील, प्रा. विजय पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकीरे, प्रा. डी. आर. पाटील व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रशांत महाजन यांनी कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना, या प्रकल्पासाठी प्रा. सचिन सयाईस यांचे मार्गदर्शन लाभले.


Our Recruiters