News

पटेल अभियांत्रिकीच्या प्रा. कुमावत व प्रा. पटेल यांच्या संशोधनाचे पेटंट मंजूर.

07-01-2019

येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रा. हेमराज कुमावत आणि प्रा. विक्रम पटेल यांनी सध्यस्थितील कॉन्क्रीट स्ट्रक्चर चाचणी करण्याच्या पद्धतीत नवे संशोधन करून ‘कॉन्क्रीट टेस्टिंग हॅमर’ नामक प्रतिकृती विकसित केली आहे. या संशोधनाला नुकतेच भारत सरकारच्या दि पेटंट ऑफिस, कोलकाता येथून मान्यता प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

स्थापत्य अभियांत्रिकी नुसार प्रत्येक वास्तू संरचनेचा आयुष्यकाळ हा मर्यादित आणि निश्चित असतो. हा कालावधी समाप्त होण्या आधीच जबाबदारीपूर्वक काळजी घेऊन जीवित हानी व वित्त हानी टाळता येऊ शकते. यासाठी ठराविक काळानंतर नियमितपणे संबंधित वास्तूरचनेची क्षमता चाचणी करणे गरजेचे असते. आजच्या काळात राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात शेकडो पूल, रहिवाशी इमारती, धरणे, शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने, इत्यादी  जीर्ण अवस्थेत आहेत. अशावेळी या वरील संरचना कोसळून मोठी हानी होण्याची भीतीदायक शक्यता नाकारता येऊ शकत नाही. यामुळे सदर वास्तूंची ठराविक आयुष्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तिची क्षमता कितपत टिकून आहे हा अनुमान लावणे कठीण आहे. यामुळे अचूक क्षमता चाचणी विकसित करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून संशोधन सुरु होते.

  प्रा. हेमराज कुमावत आणि प्रा. विक्रम पटेल हे मागील दोन वर्षांपासून त्यांच्या विभागातील चतुर्थ वर्षाचे सचीन पवार, सागर गवळी, आशिष क्षत्रिय, धरम क्षितीज, आणि दिपक कोकनी या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या संशोधन प्रयोग शाळेत सदर उपकरण विकसित करण्यासाठी मेहेनत घेत होते. अनेक प्रयोगांती सदर प्रतिकृती पूर्णत्वास येऊन तिचा वापर ० ते ३० वर्षे झालेल्या विविध वास्तू संरचनेवर करण्यात आला व या प्रतिकृतीस ‘कॉन्क्रीट टेस्टिंग हॅमर’ असे नामकरण करण्यात आले. सदर संशोधन पेटंट करून घेण्यासाठी भारत सरकारच्या दि पेटंट ऑफिस, कोलकाता येथे नोंदून घेण्यात आले होते. यानंतर वर्षभरानंतर या कॉन्क्रीट टेस्टिंग हॅमर चे पेटंट विभागातर्फे परीक्षण करून यांस मान्यता प्राप्त झाली. यामुळे वर्तमानस्थितीत हे उपकरण कमीत कमी खर्चात उच्च भार असलेल्या वास्तू संरचनेच्या क्षमता तपासून घेण्यासाठी एकमात्र साधन आहे.

आर. सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे देखील प्रा. हेमराज कुमावत यांना या संशोधानासाठी आर्थिक पाठबळ देऊन त्यांच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन दिले गेले. तसेच प्रा. कुमावत व प्रा. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सचीन पवार, सागर गवळी, आशिष क्षत्रिय, धरम क्षितीज, आणि दिपक कोकनी यांच्या नावे देखील विद्यार्थिदशेतच पेटंट नोंदणी होणे अतिशय उल्लेखनीय बाब समजली जात आहे.

प्रा. हेमराज कुमावत व प्रा. विक्रम पटेल व विद्यार्थी यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा.सुहास शुक्ल, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. जी. व्हि. तपकिरे प्रा. डी.आर. पाटील, प्रा. व्ही.एस. पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.Our Recruiters