News

पटेल अभियांत्रिकीला बाहा चॅम्पियन्सशिप - २०१९ स्पर्धेत रॉक क्रॉल इव्हेन्ट मध्ये प्रथम पारितोषिक

31-01-2019

पटेल अभियांत्रिकीला बाहा चॅम्पियन्सशिप - २०१९ स्पर्धेत रॉक क्रॉल इव्हेन्ट मध्ये प्रथम पारितोषिक

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिर्स अन्तर्गत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या बाहा- २०१९ नॅशनल रेसिंग कार या स्पर्धेत आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकेल इंजिनीरिंग शाखेच्या विद्याथ्यांनी यश मिळवले आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये कार निर्मितीबद्दल कौशल्य विकसित होण्यासाठी सदर स्पर्धा ही सुवर्ण संधी समजली जाते. दोन टप्प्यात घेण्यात येणारी हि स्पर्धा पिथमपूर, इंदोर येथे झाली. सदर स्पर्धेसाठी भारतातून ५५० हुन अधिक  टीम ने रेजिस्ट्रेशन केले. स्पर्धेचा पहिला टप्पा व्हर्चुअल राऊंड असून त्यात लेखी परीक्षा अँड कार डिझाइन सादरीकरण असते. त्यात आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाने इंजिन बेस अँड इलेक्ट्रिकल बेस अश्या दोन कार सादर केल्या. दुसऱ्या टप्यात कारचे मॉडेल बनवून पिथमपूर इंदोर येथे रेसिंग स्पर्धा घेण्यात आली. दुसऱ्या टप्यासाठी इलेक्ट्रिकल आणि इंजिन कार साठी भारतातून अनुक्रमे ४८ आणि ११६ टीम सिलेक्ट झाल्या.विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या  कार चे तांत्रिक दृष्ट्या विविध स्तरावर परीक्षण केले जाते. कार निर्मिती क्षेत्रातील तज्ञ मंडळी परिक्षक म्हणून रेसिंग कारची डिझाईन, गतिशीलता, ब्रेक, स्टेरिंग, ट्रान्समिशन, वाहन सुरक्षितता, अश्या बरेच चाचण्या घेतात. पटेल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या स्वप्नील बडगुजर, भूषण पाटील,कल्पेश पाटील,प्रतीक सोनवणे व इतर विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवत , नुकत्याच लागलेल्या निकाला नुसार आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्याथ्यांनी इलेक्ट्रिकल बेस कार मध्ये रॉक क्रॉल या अतिशय कठीण अश्या इव्हेन्ट मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. सदर इलेक्ट्रिकल बेस कारला रुपये ५०,०००/- आणि सन्मान चिन्ह देण्यात आले   यात सदर स्पर्धेसाठी प्रा. प्रविण  सरोदे , प्रा.निलेश शिंदे , प्रा. प्रदीप जमादार, प्रा. कैलास देवरे आणि प्रा. कृष्णा कोष्टी यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. आ. अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक मा. कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जि. व्ही. तपकिरे, प्रा. डी. आर. पाटील, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन आदींनी अभिनंदन केले.


Our Recruiters