News

पटेल अभियांत्रिकीच्या ५० विदयार्थ्यांची धूत ट्रान्समिशन कंपनीत निवड

07-02-2020

शिरपूर : येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन व इलेक्ट्रिकल शाखेच्या अंतीम वर्षातील ५० विद्यार्थ्यांची धूत ट्रान्समिशन प्रा. लि. या वाहन उद्योग क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपनीत ग्रज्युएट ट्रेनी इंजिनियर या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
  धूत ट्रान्समिशन प्रा. लि. व आर. सी. पटेल अभियांत्रिकी, शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. सन १९९९ मध्ये स्थापित, धूत ट्रान्समिशन प्रा. लिमिटेड (DTPL) ने आपल्या संशोधन आणि नाविन्यपूर्ण घडामोडींद्वारे भारताला तंत्रज्ञानाचे दरवाजे उघडले. एक समर्पित आणि कार्यक्षम गट, डीटीपीएल वायर हार्नेस, केबल सिस्टम, कॉपर वायर्स, इलेक्ट्रॉनिक्स टूलींग, स्टॅम्पिंग आणि मोल्डिंग सिस्टमसाठी सोल्यूशन प्रदान करण्यात उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहे. DTPL चे मुख्य उद्दीष्ट वाहन उद्योगासाठी ग्रीन सोल्यूशन प्रदान करणे आहे. सदर कंपनी ही उच्च गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांसह काही मुख्य वाहन आणि उपकरणे उद्योग व्यवसायात सहभागी आहे. वाहन उद्योगातील एक दिग्गज कंपनी म्हणून डीटीपीएल सर्वश्रुत असतांना पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानासह हरित राष्ट्र तयार करण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था म्हणून देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 
  अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत, वैयक्तिक मुलाखत, एच. आर. राउंड आणि शेवटी मॅनेजमेंट राउंड झाला. त्यात आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रोनिक्स अँड टेलीकम्युनिकेषन शाखेचे १५, इलेक्ट्रिकल शाखेचे ११ व मेकॅनिकल शाखेचे २४ या प्रमाणे एकूण ५० विद्यार्थ्यांची ग्रज्युएट ट्रेनी इंजिनियर या पदावर रु. १.४४ लाख या वार्षिक वेतन श्रेणीवर निवड झाली आहे. निवड प्रक्रियेच्या यशस्वितेसाठी प्रा. एस. एन. परदेशी, प्रा. पी. एस. पाटील, प्रा. एल. एस. महाजन, प्रा. व्ही. एस. रघुवंशी यांनी परिश्रम घेतले. 
  विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, विभाग प्रमुख प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. पी. एल सरोदे, प्रा. व्ही. एस. पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, जनसंपर्क अधिकारी प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Our Recruiters