News

वंचीतांनी अनुभवली भावी अभियंत्यांची आपुलकीची ऊब

26-01-2020

शिरपूर: विद्यार्थी जीवनातच भावी अभियात्यांमध्ये सामाजिकतेची जाणीव व्हावी , तसेच आपण समाजाला काही देणे लागतो ही भावना रुजविण्यासाठी येथील आर.सी.पटेल आभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ह्या अंतर्गत महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी ई- बिल्डर ग्रूप ची स्थापना केली असुन या ग्रूप च्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात याच उपक्रमाच्या अंतर्गत अलीकडेच राहत २०२० च्या अंतर्गत विभागातील द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी सामाजिक कृतज्ञतेच्या जाणीवेतून आदिवासी पाड्यांवर ७५० हून अधिक कपडयांचे (स्वेटर्स ,शॉल ,टोपी , मफलर  ई. ) वाटप करण्यात आले. याच बरोबर लहान मुलांना खाऊच्या स्वरूपात बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. 
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.पी.जे.देवरे, संगणक विभाग प्रमुख डॉ.नितीन पाटील यांचे  मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शकील पिंजारी, प्रा. पूजा सराफ, प्रा. विनीत अघम तसेच शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवाकांमधून अग्रवाल अदिती, जैन रिद्धी , बडगुजर मनाली, पाटील राज, पाटील रोहित  , सावंत घनश्याम , गुजराथी सुमीत, बारी जागृती, जैन याशिका, महाजन गुंजन व सैंदाणे अक्षय यांनी केले.  


Our Recruiters