News

दुबई (UAE) येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत पटेल अभियांत्रिकीचे प्रा. हेमराज कुमावत यांचा शोधनिबंध.

26-02-2020

शिरपूर येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विद्याशाखेचे प्रा. हेमराज  कुमावत यांनी नुकताच दुबई (UAE) येथे एएसईटी, आयईईई एक्सप्लोरर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरंस ऑन अॅडव्हांस मटेरियल्स, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग’ याआंतरराष्ट्रीय परिषदेत'Experimental Investigation on Relationships Between Rebound Index and Compressive Strength of Cement Concrete Specimen Influenced by Physical Factors'हाशोधनिबंध सादर केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक–विद्यार्थी आणि इतर तज्ञ मंडळी एकत्रित करून त्यांच्याकडील नवकल्पना व ज्ञानाची देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने  तसेच अभियांत्रिकीतील निरनिराळ्या विषयांवर संशोधनात्मक चर्चासत्र व शोधनिबंध सादरीकरण घडवून आणण्यासाठी दुबई (UAE) येथे अॅडव्हांस इन सायन्स अँड इंजिनिअरींग टेक्नोलॉजी(ASET)-२०२० तर्फे तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध केले. सदर परिषदेचे प्रायोजन आयईईई एक्सप्लोरर या नामांकित शोधनिबंध प्रकाशन संस्थेने केले होते. या तीन दिवसीय परिषदेसाठी जगभरातून ५०० पेक्षा अधिक संशोधकांनी सहभाग नोंदवला.

प्रा. हेमराज  कुमावत हे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत असून डॉ. नारायण चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एच.डी. करत आहेत. यापूर्वी देखील प्रा. कुमावत यांना इजिप्त-इंडिया अकॅडमीक एक्सलंस अवार्ड, सर आर्थर कॉटन मेमोरियल प्राईज, बेस्ट फॅकल्टी अवार्ड ऑफ दि यिअर या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रिय स्तरावर आय.आय.टी. दिल्ली आणि चेन्नई सारख्या अनेक ठिकाणी महत्वपूर्ण परिषदांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला आहे. पटेल अभियांत्रिकीत अध्यापन करत असतांनाच प्रा. कुमावत यांनी अविरतपणे संशोधन करून आत्तापर्यंत त्यांच्या ३ संशोधनांची पेटंट नोंदणी देखील झाली आहेत. प्रा. कुमावत हे दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)चेसभासद असून मागील तीन वर्षात संकलित केलेल्या माहितीच्या आधारे भारतातील जुन्या इमारतींची धारण क्षमता तपासण्या करिता रीबाउंड हॅमरच्या कार्यपद्धतीत सिमेंट आणि ग्रेड मिक्स यांतील बदलामुळे निर्माण होणारे परिणाम शोधून त्यावर योग्य तो बदल करण्याचा प्रयत्नावरील संशोधन त्यांनी यशस्वी रित्या केले. याच संशोधनावर आधारित शोधनिबंध दुबई येथे झालेल्या  ‘इंटरनॅशनल कॉन्फरंस ऑन अॅडव्हांस मटेरियल्स, डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग’ याआंतरराष्ट्रीय परिषदेत प्रा. कुमावत यांनी सादर केला. याकामी प्रा. कुमावत यांना तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीतील धनंजय जाधव या विद्यार्थ्याने संशोधन कार्यात सहकार्य केले आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असतांनाच विद्यार्थी म्हणून त्याने देखील वरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला.

प्रा. हेमराज कुमावतआणि विद्यार्थी धनंजय जाधव यांच्या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष श्री. भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री. राजगोपाल भंडारी, संचालक श्री तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, विभागप्रमुख प्रा. सुहास शुक्ल, डॉ. नितीन पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. विजय पाटील, ट्रेनिंग & प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिल्केश जैन महाविद्यालयाचे कुलसचिव प्रशांत महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकार्यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Our Recruiters