1000+ Campus Placements in One Year

1000+ Campus Placements in One Year

1000+ Campus Placements in One Year

कोरोनाच्या काळातही आर. सी. पटेल अभियांत्रिकीत एक हजारच्या वर प्लेसमेंट: 

दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षणासह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपनीशी समन्वय साधून केलेल्या पाठपुराव्याच्या बळावर येथील आर सी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर, या अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोना प्रादुर्भावाच्या विपरीत परिस्थितीतही एक हजाराच्या वर प्लेसमेंटचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही अनेक कंपन्याची निवड प्रक्रिया सुरु असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे बी पाटील यांनी दिली. यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ६४० तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तीन महिन्यातच ३७४ प्लेसमेंट ऑफर महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत मिळालेल्या असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले.

खान्देशातील विद्यार्थ्यांना महानगरातील विद्यार्थ्यांसारखे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणा बरोबरच चांगला रोजगार,नोकरी मिळावी व त्यांच्या पर्यायाने येथील सामाजिक जीवनमानात प्रगतीशील बदल घडावा या उद्देशाने शिक्षण महर्षी आ.अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शिरपूर ची स्थापना केली. अवघ्या वीस वर्षाच्या अल्पकाळात महाविद्यालयाने या उद्दिष्टपूर्तीकडे झेप घेतली असून परिसरातील अनेक विद्यार्थी देश विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

गतवर्षी आलेल्या करोना महामारीने देशात विशेषतः औद्योगिक क्षेत्रात अनेक समस्या निर्माण केल्यात. या विपरीत परिस्थितीमुळे शिक्षण क्षेत्रात देखील अनेक बदल झाले. या बदलांना व आव्हानांना सामोरे जात महाविद्यालयाने अभ्यासक्रम पुढे नेतांनाच रोजगारा विषयी च्या संधी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कश्या उपलब्ध करून देता येतील ह्या साठी अथक परिश्रम घेतलेत. परिणामी करोना महामारी व लॉकडाऊन ची झळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला व रोजगाराच्या संधीना न पोहोचू देता उलट जास्तीत जास्त विद्यार्थ्याचे प्लेसमेंट करून उल्लेखनीय कामगिरी केली.

महाविद्यालयाच्या या प्रयत्नांना विद्यार्थ्यांनी व पालकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळेच कोरोनाच्या काळातही विद्यार्थ्यांना उच्च वेतनश्रेणी वर नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपनीत प्लेसमेंट ऑफर मिळविणे शक्य झाले. यात नामांकित व जगप्रसिध्द अश्या टीसीएस समुहात- १३०,विप्रो-१२८ ,अँटोस ग्लोबल-८७ , कँपजेमिनी -७२ ,अँक्सेंचर-४७ ,कॉग्नीजंट-४७, परसिस्टेंट-३१, टेक महिंद्रा -३८, ईइंफोचीप्स -३५, इन्फोसिस-१७, केपीआयटी-१६, रिलायन्स जिओ -१०, डीटीडीसी-११, बिर्लासॉफ्ट-०९, इव्होसिस-१०, एनएसईआयटी-०९ या प्रमुख कंपन्यांसह मेडिया नेट, बायजूस ,लिडो लर्निंग ,झोरीएंट, ,माइंडट्री ,रियलटर्स, एमडॉक्स ,कांतार , बिटवाइज, पी.आय.टी , झिमेट्रिक्स, डी.एक्स.सी. टेक्नॉलॉजी, एल.टी.आय., इंटेलेक्ट, फुजित्सू, एटोस सिंटेल, रिलायन्स एस.एम.एस.एल., ए.आय.एस.ग्लास , वेबटेक डेव्हलपर्स, हॅपहप, प्रगती आय.एन.सी., सिनरझिप, आर्को इंजिनियर्स, सक्सेसीव्ह टेक्नॉलॉजीज, टीमलीज (व्होडाफोन),पोर्टक्वी, स्वभाव टेक लॅब, माइंडट्री(सी अँड आय), फोर्स मोटर्स, ऍमेझॉन, यश अग्रवाल इंजिनियर्स, कोलाबेरा, स्ट्रायडली सोल्युशन्स, क्लोव्हर इन्फोटेक, इंटेल करीअर, ग्लोबलस्टेप, प्युअर इव्ही एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, क्यूडिग्री (अपोलो टायर्स), ओबुल कन्सल्टन्सी, केसपॉइंट, एमजी सीटिंग सिस्टम, फाईव्ह एस सोल्युशन्स, यमुना ट्रेडिंग, नितीराज इंजिनियर्स, ध्येय कन्सल्टिंग, फुकोकू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पॅरामॅट्रिक्स टेक्नॉलॉजीज, वेजेस, वेक्टर अॅनालिटीक्स, सम्यक, भवानी इंडस्ट्रीज, स्माईल डेव्हलपमेंट, कोन्सेन्ट्रिक्स, सॅन्ट्रोनिक्स ,एलेक्ट्रि टेक्नॉलॉजीज, शलाखा इंडस्ट्रीज, चेग, कोणार्क ग्लोबल, जीआयसी, व्हाईटहॅट जूनियर, धूत ट्रान्समिशन, अभीवर्धी इंजिनियर, यंत्रम स्टुडिओ, ऍपटेक एनर्जी सोलर, मार्केटिंग मंत्रा, विचक्षण टेक्नॉलॉजीज, व्हर्टीकल फॉक्स, क्वारेक्स रीसोर्सेस, सनलिंक फोटोव्होल्टेइक, एच जी. इन्फ्रा इंजी. ली., मेक माय हाउस, मोलेक्युलर कनेक्शन आदी कंपनीत एकुण एक हजारच्या वर प्लेसमेंट ऑफर मिळालेल्या असल्याचे महाविद्यालयातील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. मिल्केश जैन यांनी सांगितले.प्लेसमेंट उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रा.एस.एन. परदेशी प्रा.व्ही.एस.रघुवंशी, प्रा.पी.एस.पाटील, प्रा. व्ही.व्ही.पटेल , प्रा.व्ही.जे.पटेल यांनी परिश्रम घेतलेत.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, संचालक व नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतन पटेल ,सचिव प्रभाकर चव्हाण , माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ.जे.बी.पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे,परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा.डॉ.नितीन पाटील, प्रा.डॉ.व्ही एस.पाटील ,प्रा.प्रवीण सरोदे, प्रा.जी.व्ही.तपकिरे, प्रा.डॉ. एस. व्ही. देसले ,ट्रेनिंग अंड प्लेसमेंट अधिकारी मिल्केश जैन , जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक
करीत समाधान व्यक्त केले आहे.


शैक्षणिक गुणवत्तेसह कँम्पस प्लेसमेंट साठी महाविद्यालयाद्वारे नियमितपणे घेण्यात येणारे विविध सॉफ्ट स्कील,व्यक्तीमत्व विकास, मुलाखत तंत्र या साठी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रमामुळे विध्यार्थ्याच्या प्लेसमेंट मध्येही उल्लेखनीय वाढ होत आहे. विशेष म्हणजे या वर्षी महाविद्यालयातील सर्वच शाखां मधील विद्यार्थ्यांना उच्च वेतन श्रेणी वर प्लेसमेंट मिळाले आहे. महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनात प्रतिष्ठेची “अ “ श्रेणी मिळविली आहे ,तसेच युजीसी ने स्वायत महाविद्यालय म्हणून मान्यता दिलेली आहे. या स्वायत्तते मुळे महाविद्यालयाने मेजर व मायनर पदवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञांशी सुसंगत तसेच आवडीच्या इतर अभियांत्रीकी शाखेतील शिक्षण व ज्ञान घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.अवघ्या वीस वर्षाच्या अल्पकाळात महाविद्यालयाने राज्याच्याच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
संचालक- डॉ.जे बी पाटील