Hackathon 2022 News
Hackathon 2022 News
आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉनसाठी महाविद्यालयीन हॅकेथॉन चे आयोजन:
आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन एस.आय.एच.२०२२ साठी महाविद्यालयीन हॅकेथॉनचे नुकतेच आयोजन झाल्याची माहिती संचालक डॉ.जे.बी.पाटील यांनी दिली.
महाविद्यालयीन हॅकेथॉन साठी २७६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला, यात एकूण ११५ मुली व १६१ मुले समाविष्ट होती . एकूण ४६ चमूंनी हॅकाथॉन मध्ये आपल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले.
भारत सरकार च्या अंतर्गत येणाऱ्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन मधील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन तर्फे संरक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण यासारख्या विविध विभागांतील समस्या पुरविल्या जाऊन, भावी अभियंत्यांकडून समस्यांवरील प्रभावी पर्याय मागविले जातात. सुरवातीला महाविद्यालयीन स्तरावरील फेरी होऊन , नंतर राष्ट्रीय पातळीवर याचे आयोजन होईल. महाविद्यालयीन स्तरावरून देशपातळीवरच्या स्पेर्धेसाठी एकूण १५ चमूंची निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना देशपातळीवर आपल्या कौशाल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धेद्वारे प्राप्त झाली. महाविद्यालयीन स्तरीय प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रा. प्रवीण भोळे , डॉ. जगदीश जाधव , डॉ. रजनीकांत वाघ व डॉ.उज्वला पाटील यांनी काम पाहिले.
हॅकेथॉनच्या आयोजनासाठी संगणक विभाग प्रमुख डॉ. नितीन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकात्सुकी कोडर्स क्लब चे शिक्षक प्रतिनिधी प्रा.रोहिदास सांगोरे, प्रा. शकील पिंजारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधींमधून शिवांग वोरा, शुभम वोरा, हार्दिक पोरीया, तरुण कुकरेजा, रोहन बडगुजर, रीशिका शर्मा, रीतीषा तारे,श्रेया शिंदे व मंगेश सोनावणे यांनी परिश्रम घेतलेत.
या उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकर चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. जे. बी. पाटील, डेप्यु. डायरेक्टर डॉ.प्रमोद देवरे ,परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा.डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.