Krishimitra Agricultural Drone First Prize News
Krishimitra Agricultural Drone First Prize News
पटेल अभियांत्रिकीच्या “कृषी मित्र-ऍग्रीकल्चर ड्रोन” ला प्रथम पारितोषिक :
स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षानिमित्त डायरेक्टर ऑफ टेकनिकल एज्यूकेशन - नाशिक विभाग व शासकीय पॉलीटेकनिक, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विले पार्ले केळवणी मंडळ संचालित इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि, धुळे, येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय प्रकल्प स्पर्धेत आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या – “कृषिमित्र ऍग्रीकल्चर ड्रोन” ला प्रथम पारितोषिक प्राप्त झाल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प निर्मिती आणि प्रदर्शन स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेसाठी नाशिक विभागातून विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०० हुन अधिक स्पर्धकांनी आपल्या प्रोजेक्ट चा सहभाग नोंदवला होता. यात मुख्यत्वे पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी, एमबीए आणि फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचा सहभाग होता. या स्पर्धेमागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाबद्दलची सर्जनशीलता, प्रतिभा, नाविन्यता व असे अनेक कौशल्य वृद्धिंगत करणे असा होता. संपूर्ण नाशिक प्रभागातील विद्यार्थ्यांसाठी
आयोजित केली गेलेल्या या प्रकल्प स्पर्धाद्वारे वास्तविक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाला साधन म्हणून पहिले गेले.त्यातून आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विद्याशाखेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी ओम पाटील, वैभव पाटील, नितीन पाटील व अतुल पाटील ह्या विद्यार्थ्यांनी “कृषिमित्र ऍग्रीकल्चर ड्रोन”चे सादरीकरण केले. या प्रोजेक्टला प्रथम पारितोषिक पटकाविले. सदर ड्रोनने प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्वच दर्शकांना आकर्षित केले. याचवेळी सादरीकरानाच्या वेळी पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थी समूहाने परीक्षकांना ड्रोनच्या प्रात्याक्षिकाद्वारे व चर्चेद्वारे प्रभावित केले. “कृषिमित्र ऍग्रीकल्चर ड्रोन”या प्रोजेक्टची उपयोगिता व महत्व पाहता यास मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यासाठी त्यांना आर सी पटेल अभियांत्रिकी शिरपुरच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख व उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे व सहयोगी प्रा. भूषण व्ही. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या ड्रोनचा कृषी विभागाला व देशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात शेतीसाठी खूप फायदेशीर असणार आहे, या ड्रोन च्या साहाय्याने शेतकऱ्याला कमी खर्चात सहजपणे शेतीचे सर्वेक्षण, शेतीची फवारणी शेताच्या कोणत्याही कोपऱ्याला मानव विरहित जाऊन ड्रोन मधील जीपीएस टेक्नोलॉजीच्या साहाय्याने पूर्ण करता येईल.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.