Persistent Campus Selection 2021-22
Persistent Campus Selection 2021-22
आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या २३ विदयार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट द्वारे पर्सीटंट कंपनीत निवड:
मिळणार वार्षिक ४.७१ लाख वेतनश्रेणी:
येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पर्सीटंट सिस्टम्स प्रा.ली. या बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ४.७१ लाख वेतश्रेनीवर ट्रेनी सॉफ्टअर इंजिनियर पदावर निवड झाली असल्याची माहिती संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.
जागतीक स्तरावरील कंपन्या तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आस्थापनांना सॉफ्टवेअर संबंधित सेवा पुरविणाऱ्या पर्सीटंट सिस्टम्स प्रा.ली.सुरुवातीपासूनच आयएसव्हीला मूल्य वितरीत करीत आहे आणि त्यांची उत्पादने नवीन बनवण्यास, डिझाइन करण्यात आणि विकसित करण्यात मदत करीत आहेत. कंपन्यांची डिजिटल प्रतिमा निर्माण करण्यासाठी व ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा प्रदान करण्यासाठी कंपनी ४.० सॉफ्टवेअरचा वापर करते , ज्यामध्ये लोक, प्रक्रिया, साधने आणि डेटा समाविष्ट आहे.
नुकतेच पर्सीटंट सिस्टम्स प्रा.ली. कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी विषेश कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातून केवळ आर. सी. पटेल अभियांत्रिकीतील विद्यार्थ्यांना पर्सीटंटच्या निवड प्रक्रियेला सामोरे जाण्याची संधी प्राप्त झाली होती.
तीन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला बुद्धिमत्ता चाचणी, तांत्रिक मुलाखत व शेवटी एच. आर. राउंड झाला. त्यात अंतिम वर्ष अभियांत्रिकीच्या कोळे तृप्ती प्रशांत, पाटील वैष्णवी संभाजी, पाटील जयेश जिजाबाराव, पाटील धीरजनामदेवराव, बिर्हाडे रोहित रवींद्र, पाटील अंकित भटेसिंग, चौधरी सागर जितेंद्र, राजपूत शुभम दरबारसिंग, चौधरी निरज दिलीप, पाटील हर्षिता यादवेश्वर,जैन जिनेंद्र विजयकुमार, शाह रुतुजा मंगलेश, चेतन राजेंद्र चव्हाण,शुभम एकनाथ धनगर, बागल वनश्री अंबाराज, लोहार जितेश संजय, पाटील निखिल विजय, बोरसे पियुष शशिकांत, पाटील कल्पेश संभाजी, माळी प्रतीक काशिनाथ, ललित ज्ञानेश्वर पाटील, सराफ संकेत संजय, सावळे प्रतिक अनिल या विद्यार्थ्यांची वार्षिक ४.७१ लाख वेतश्रेनीवर ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर निवड झाली. मुलाखत प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर मिल्केश जैन, व्ही.एस.रघुवंशी व प्रा.एस.एन. परदेशी यांनी परिश्रम घेतलेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ.प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ.नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. प्रवीण सरोदे, डॉ.सतीष देसले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.