Departmental News of Electronics & Telecommunication Engineering

Departmental News of Electronics & Telecommunication Engineering:

RCPIT in NEWS

आर. सी. पटेल अभियांत्रीकीत तंत्र महोत्सव “कन्व्हर्जेस-२०२४” चे यशस्वी

आयोजन

शिरपूर: येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित केलेल्या “कन्व्हर्जेस २०२४” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फॉक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक चे जनरल मॅनेजर श्री. प्रल्हाद धुमाळ, शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री राजगोपाल भंडारी, पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, विभागप्रमुख, विविध समितीचे अधिष्ठाता, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कन्व्हर्जेस-२०२४ या दोन दिवसीय टेकफेस्ट मध्ये विविधतेचा स्वीकार करीत तंत्रज्ञान क्षेत्रात शिस्त, आव्हान आणि स्वारस्य यांचा समावेश केला गेला. कोडिंग आव्हानांपासून ते रोबोटिक्स स्पर्धा, आर्थिक साक्षरता कार्यशाळेपासून ते शाश्वत उपक्रमांपर्यंत प्रत्येकासाठी काहीतरी आगळे वेगळे करण्याची संधी कन्व्हर्जेस-२०२४ ने उपलब्ध करून दिली. या तंत्रज्ञाच्या उत्सवामुळे विद्यार्थी, व्यावसायिक आणि तज्ञांना एकत्र आणून सहभागींना विचारांची देवाणघेवाण आणि एकमेकांकडून शिकण्यासाठी प्रोत्साहन प्राप्त झाले. पारंपारिक टेक फेस्ट्स हे पूर्णपणे कोडिंग किंवा अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित करतात, परंतु पटेल अभियांत्रिकीच्या या तंत्र महोत्सवात कोड क्रेझ, पाथ ब्रेकर चॅलेंज, डिटेक्टिव रिटर्नस, वाटर रॉकेट, सिव्हिस्ता, स्ट्रेंजर कोड, टेक एक्स्पो, इलेक्ट्राक्स, ट्रेड टेक अशा एकून नऊ स्पर्धांचा तांत्रिक महोत्सवात समावेश करण्यात आला होता. या विविध स्पर्धांमध्ये ४४२ स्पर्धकांचे समूह मिळून १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, तंत्रज्ञानामध्ये प्रचंड वेगाने होणारे बदल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या प्रावीण्याला व शोधवृत्तीला दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून अश्या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करणे गरजेचे आहे. अश्या कार्यक्रमातील सहभागातून संभाषण कौशल्य, व्यक्तीमत्व विकास, टीम वर्क, प्रेझेन्टेशन स्किल्स या सारखे विविध कौशल्ये विकसित होऊन पुढील व्यवहारी जीवनात त्याचा फायदा होतो. ह्या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरु केले आहेत. त्यांच्या स्टार्टअपची संकल्पना मागील वर्षांमध्ये झालेल्या कन्व्हर्जेस मध्येच त्यांना गवसली आणि त्यांनी त्याचे पुढे व्यवसायात रुपांतर केले. बरेचसे विद्यार्थी आज यशस्वी उद्योजक म्हणून प्रस्थापित झालेले आहेत. पटेल अभियांत्रिकी कडून कन्व्हर्जेस सारख्या तंत्र महोत्सावांच्या आयोजनाच्या फलस्वरूप भविष्यातील उद्योजकांची पायाभरणी निश्चित होईल अशी अपेक्षा कार्यकामातील मान्यवरांनी व्यक्त केली.

“कन्व्हर्जेस २०२४” मध्ये महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थांनी त्यांच्या वेळी आयोजित केलेल्या कन्व्हर्जेस च्या आठवणीना उजाळा दिला. यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कु. हर्षदा जाधव (डेटा इंजिनीअर- कॅपजेमिनी पुणे), श्री. फुलारी ललित भरत (सिनियर डेटा सायंटिस्ट-कॅपजेमिनी पुणे), श्री. चेतन भरत येशी (सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर -टेक महिंद्रा पुणे), श्री हर्षल प्रकाश जगताप (मॅनेजिंग डायरेक्टर -एस. एस. प्लास्टो, दमन) व श्री शिवकुमार चौधरी (टेक लीड-KPIT टेक्नॉलॉजीज, पुणे) उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कल्याण विभागाच्या अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी व विद्यार्थी समन्वयकांमधून वेदांत ठाकूर, उदय भारतीय आणि वेदांत देशमुख यांनी परिश्रम घेतले. या वर्षी झालेल्या टेक्निकल फेस्टिवल

मधील स्पर्धा व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे. कोड क्रेझ मध्ये श्रीयान पाटील, वैशाली ठाकरे, स्वराली बेडसे,राजेश खवणे (प्रथम) प्रणल रोकडे, जयेश सोनवणे, केतन लोहार, प्रसन्नजीत जैन (द्वितीय) यश चौधरी, संजीवनी राजपूत, कुणाल साळुंके, सतीश सोनवणे (तृतीय). पाथ ब्रेकर मध्ये अरबाज खान, अनिकेत श्रीराम, आदित्य इंगळे, प्रथमेश टिपले (प्रथम

आणि द्वितीय) विनीत वानखेडे, किंजल लोहार, चैतन्य पाटील, साक्षी काटोळे (तृतीय). डिटेक्टिव रिटर्नस मध्ये दिपक बच्छाव, रोहित देसले, यश देवकर, रुषिकेश सोनजे (प्रथम) रोहन पवार, ललित खलाणे, प्रथमेश पाटील, ओम जाधव (द्वितीय), माधुरी कलाल, जागृती राजपूत, दामिनी कलाल, संजना नेवालिया (तृतीय). वाटर रॉकेट मध्ये हेमराज कोळी, आकाश पाटील, मयूर कोळी, सुमित गिरासे (प्रथम), जयेश पाटील, हितेश परदेशी, चेतन वरुडे, रुषिकेश ठाकरे (द्वितीय ), कुणाल पाटील, वेद पाटील, खुशाल बडगुजर, अजय वाघ (तृतीय). सिव्हिस्ता मध्ये सिव्हील क़्विज़ स्पर्धेत प्रेरणा पाटील, पुष्पराज पाटील, निर्भय पाटील, रिया देशमुख (प्रथम) शुभम चौधरी, श्रुतिक पाटील, पराग गावंडे, प्रथमेश गावंडे (द्वितीय) शैलेंद्र पवार, गौरव चौधरी, दिपेश देसले, प्राजोल खलाणे. (तृतीय). ब्रीजोमेनिया स्पर्धेत संकेत न्हाळदे, मानसी पाटील (प्रथम). पुर्वी अहिरराव, श्वेता पाटील, मयुरी सनेर, हर्षदा शिरसाठ (द्वितीय). लोकेश चौधरी, जयेश खैरनार, अनंत देवरे (तृतीय). बोट फ्लोट स्पर्धेत पवरा रेवसिंग, शैलेंद्र पावरा, निकिता ठाकरे, श्रुतिका चौधरी (प्रथम). अमोल पावरा, दुर्गेश जाधव, विवेक पवार, गौरव कदम (द्वितीय). पुर्वी अहिरराव, हर्षदा शिरसाठ, मयुरी सनेर, दर्शन पाटील (तृतीय). स्ट्रेंजर कोड मध्ये सार्थक पाटील, मेघना पाटील, गीतांजली पाटील, तेजस पाटील (प्रथम), उदय पाटील, जिनेंद्र गावित, रुषिकेश पाटील, गणेश पवार (द्वितीय), गौरव धनगर, मयुरेश परदेशी, पार्थ मोरे, मिलिंद राजपूत (तृतीय). टेक एक्स्पो मध्ये जानव्ही चौहान, पायल पाटील (प्रथम). तन्मय महाले, रामेश्वर

माळी, गौतम पाटील, युगंधर बोरसे (द्वितीय). युक्ता बडगुजर, ललित खलाणे, पराग निकुम, आदिती पाटील, यश पवार, भाग्येश राजपूत, (तृतीय). याच प्रमाणे शालेय स्तरावरून मुकेश आर. पटेल मिलिटरी स्कूल चे अटल स्कूलच्या पवन शिंदे, वेद लोहार, जतीन पटेल, देवेश चौधरी (प्रथम). आर. सी. पटेल इंन्ग्लीश मिडीयम स्कूल चे सर्वेश रोकडे, वेद ठाकरे (द्वितीय). एच. आर. पटेल

कन्या माध्य. शाळेच्या आयुषी पातुरकर, तनिष्का पाटील (तृतीय). इलेक्ट्राक्स मध्ये वेस्ट टू वॅट स्पर्धेत रिया भगवान पाटील, गायत्री कैलास धुरकुंडे (प्रथम). वैष्णवी पाटील, युक्ता बडगुजर (द्वितीय), प्रणिल पवार, हर्षा दहिवदकर (तृतीय). इलेक्ट्रोटोय मेकिंग मध्ये कामिनी राजपूत, निकिता गिरासे, जयकुमार राजपूत, कोमल कुमावत (प्रथम). धीरज रवंदळे, सुमित वासवानी, निशांत सोनवणे, ओम सोनवणे (द्वितीय), यश बारी, सतपालसिंग राजपूत, प्रणव जगताप (तृतीय). ट्रेड टेक मध्ये मंदार विसावे (प्रथम). भावेश पाटील (द्वितीय). निशांत पाटील (तृतीय). सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही.तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, डॉ. डी. आर. पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.


The "Innovation and Entrepreneurship Outreach Program in Schools/Community” event was organized by NMIMS, Shirpur, and R. C. Patel Institute of Technology, Shirpur, in association with Sobus, on December 22, 2023. The distinguished speaker, Mr. Arjun Malhotra is a trailblazer in the realm of Information Technology. Co-founder of the HCL group in 1975, he transformed it into one of India's largest IT corporations. In 1989, he took the helm of HCL's US operations, now known as HCL Technologies, growing it to nearly $100 million in annual revenues. He shared his remarkable words about how rural talent, innovation, skill development and progress have become a collaborative, inclusive and forward-moving path. Let us work together to bridge the gaps and foster progress. A student-led exhibit displaying innovations and ideas across different sectors. Around 700 students interacted over a series of events. A panel discussion with stakeholders from the government, academia, industrialists & students, towards building an ecosystem.

#IIC

#Entrepreneurship

#Innovation


RCPIT in NEWS


RCPIT in NEWS




पटेल अभियांत्रिकीच्या १६ विदयार्थ्यांची ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर पदासाठी निवड:

शिरपूर: येथिल आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, संगणक इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील १६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटद्वारे हेक्सावेअर या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांनी दिली.

हेक्सावेअर टेक्नोलोजीज हि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. जगभरात एकूण ३३ पेक्षा जास्त कार्यालयातून माहिती तंत्रज्ञासंबंधित सेवा पुरविण्याचे कार्य सदर कंपनी करत आहे. यांत बँकिंग, शिक्षण, ट्रेडिंग मार्केट, वाहतूक आणि दळणवळण, मॅन्युफॅक्चरिंग, पर्यटन, इत्यादी प्रकारच्या दुसऱ्या कंपनींना आवश्यक असलेले माहिती तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उत्पादने आणि त्यासंबंधित सेवा पुरविण्याचे काम करते. म्हणूनच हेक्सावेअर या कंपनीस आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार आणि मानांकन प्राप्त झाले आहेत. सदर कंपनीतर्फे आर. सी. पटेल अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑन कँपस ड्राईव्ह चे आयोजन केले होते. पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचे विद्यार्थी या कॅम्पस प्लेसमेंटसाठी पात्र होते. दोन स्तरावर झालेल्या या निवड प्रक्रियेत सुरवातीला अभियोग्यता आणि तांत्रिक चाचणी झाली. यानंतर वयक्तिक आणि तांत्रिक मुलाखतीच्या फेऱ्या झाल्या. यांत यशस्वीरीत्या पुढे जात संगणक अभियांत्रिकी विद्याशाखेतील जय अनिल बोदाडे, हितेश साहेबराव मराठे, गौरव मनोज चव्हाण, भूषण महादू पाटील, शुभम कौशिक व्होरा, शिवांग कौशिक व्होरा, सौरभ प्रदिप पाटील, विनित युवराज नेहेते, अश्विनी परमेश्वर लुकाडे, जागृती राजेंद्र वाघ, ऋषिका अतुल शर्मा, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विद्याशाखेतील कार्तिक सुभाष कानडे, जुही विजय मेने, यामिनी संजय मेने, सायली हिरामण उघाडे आणि इलेक्ट्रिकल विद्याशाखेतील मोहित रवींद्र पाटील या १६ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये ग्रज्युएट ट्रेनी इंजिनिअर या पदासाठी वार्षिक रु. ४ लाख या वेतनश्रेणीवर निवड झाली. महाविद्यालयाच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या संवाद कौशल्य, अभियोग्यता चाचणी, प्रशिक्षण आणि चाचणी मुलाखती, करिअर प्लॅनिंग, मुलाखत तंत्र, गट चर्चा इ. उपक्रमांचा फायदा विद्यार्थ्यांना निवडप्रक्रियेला सामोरे जातांना झाला. या उपक्रमांसाठी आणि महाविद्यालयाचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. मिल्केश जैन, समन्वयक प्रा. मयूर पाटील, प्रा. अनुपकुमार जयस्वाल आणि प्रा. विनीत पाटील यांनी परिश्रम घेतले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
































पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची गुगल मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची गुगल मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड














University Results

Heartiest Congratulation to

Divya Pardeshi, student of R C Patel Institute of Technology, Department of Electronics and Telecommunication  for securing Two Gold Medals in university examination of academic year 2019-2020.

She got CGPA of  9.61

First Gold Medal:
She stood first in Electronics and Telecommunications Branch among all boys and Girls.

Second Gold Medal:
 She stood first among all girls across all branches of Engineering.

Many many congratulation to Divya and all Faculty members for this extraordinary achievement.